'भारत भारती' आयोजित पणजी येथे सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय एकता संमेलन' - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2026

'भारत भारती' आयोजित पणजी येथे सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय एकता संमेलन'



मडगाव : सी एल वृत्तसेवा 

  लोहपुरु ष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशे व्या जयंतीनिमित्त पणजी गोवा येथे राष्ट्रीय एकता संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल योद्धा परमवीर चक्र विजेता  कप्टन योगेंद्र सिंह यादव उपस्थित होते. ईएसजी कांप्लेक्स पणजी येथे  पार पडलेल्या कार्यक्रमाचे आयोजन भारत भारती गोवा यांच्यावतीने करण्यात आले होते. 

   महाराष्ट्र मंडळ गोवा सांस्कृतिक विभागाने गायिलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला सुरुवात झाली. कॅप्टन योगेंद्र सिंह यादव, भारत भारती चे राष्ट्रीय अध्यक्ष विनय पत्राले, गोवा अध्यक्षा सौ अर्चना शहा यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. भारत भारती च्या प्रभारी सौ वैशालीताई लवंदे यांनी स्वागत, प्रास्ताविक  व मान्यवराची ओळख करून दिली. 

 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतील सर्व संस्थाने भारतात विलीन करून भारत एकसंध करून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यास बळकटी दिली. जोधपूर, अलिगढ, आणि हैदराबाद आदी संस्थाने सहजासहजी भारतात विलीन होण्यास तयार नव्हती त्यांना विलिनीकरणाच्या प्रवाहात सामील करून एक भारत श्रेष्ठ भारत या वर भर दिला. भारत एकसंध, भारताची एकात्मता, भारताचे ऐक्य, राष्ट्रीय सद्भावना  टिकवण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे फार मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन विनय पत्राले यांनी नमूद केले. कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी आपल्या भाषणांतून कारगिल युद्धातील टायगर पांईंटवर विजय मिळेपर्यंतची शौर्यगाथा विषद केली.  

   यावेळी गोमंतकातील क्रीडा,  वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना सरदार  पटेल गौरव चिन्ह देऊन कप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अर्चनाताई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कार्यक्रमात एक भारत श्रेष्ठ भारत, गोवा म्हणजे छोटा भारत याचे दर्शन घडवण्यासाठी विविध प्रांतातील, राज्यातील व्यंजने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र मंडळ गोवा चे अध्यक्ष अनिल पाटील यांनी ऱंगमंच व्यवस्था  व सुत्रसंचलन केले.

No comments:

Post a Comment