विद्या मंदिर कोलिक शाळेसाठी ₹८२.८२ लाखांचा निधी मंजूर - आमदार शिवाजीराव पाटील यांचा पाठपुरावा - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2026

विद्या मंदिर कोलिक शाळेसाठी ₹८२.८२ लाखांचा निधी मंजूर - आमदार शिवाजीराव पाटील यांचा पाठपुरावा

 


चंदगड, दि. ११ / सी एल वृतसेवा

 चंदगड तालुक्यातील विद्या मंदिर कोलिक शाळेच्या विशेष दुरुस्ती व विविध सुविधा उभारणीसाठी तब्बल ₹८२ लाख ८२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती मिळाली.

या निधीच्या माध्यमातून शाळेच्या इमारतीची दुरुस्ती, आवश्यक पायाभूत सुविधा, शैक्षणिक साधनसामग्री तसेच विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित व सुविधायुक्त वातावरण निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून शाळेच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या या पाठपुराव्यामुळे कोलिक परिसरातील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी मिळालेला हा निधी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच या कामासाठी निधी मंजूर करून घेतल्याबद्दल आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांचे सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment