![]() |
| चंदगड : कोल्हापूरचे कामगार आय़ुक्त विशाल घोडगे यांच्या हस्ते ऊसाचा रस घेवून उपोषण सोडताना कामगार, शेजारी विजय देवणे, उदय नारकर व कामगार |
चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा.लि. संचलित दौलत सहकारी साखर कारखाना कामगारांचे थकीत वेतन व हंगामी कामगारांचे थकीत रिटेनिंग अलॉन्स व हंगामी कामगारांना त्वरीत कायम करणे याबाबत तहसिलदार कार्यालय चंदगड येथे कामगारांच्या वतीने दि. ०२/०४/२०२६ इ. रोजीपासुन तहसिलदार कार्यालया जवळ आमरण उपोषण आज दि. ११/०४/२०२६ इ. रोजी पर्यंत चालु होते. आज कोल्हापूरचे कामगार आय़ुक्त विशाल घोडगे यांनी चंदगड येथे उपोषणस्थळी हजर राहून कामगारांना केलेल्या मार्गदर्शनात कोल्हापूर येथे १६ एप्रिलला संघटना, कामगार व व्यवस्थापन यांच्यात चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. तसेच त्यांनी लेखी पत्राद्वारे आश्वासन दिल्याने त्यांच्या विनंतीला मान देत कामगारांनी आपले आमरण उपोषण कामगार आयुक्यांच्या हाताने ऊसाच रस पिऊन तात्पुरते स्थगित केले आहे.
दरम्यान कामगार आयुक्त विशाल घोडगे यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली व कामागरांच्या प्रलंबित वेतनासंदर्भात दि. ०८/०४/२०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात येथे निवासी उपजिल्हाधिकारी, प्रादेशिक सहसंचालक (साखर), सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी, व्यवस्थापन प्रतिनिधी मानसिंह खोराटे, विजय मराठे, अॅड. संदिप मुतालिक व कामगार प्रतिनिधी आबासाहेब चौगुले, उदय नारकर व विजय देवणे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीमध्ये कामगारांचे प्रलंबित वेतन देण्याबाबत व्यवस्थापनाला सुचित करण्यात आले आहे.
आज कामगार आयुक्तांनी कामागरांना केलेल्या आपल्या मार्गदर्शनात दौलत कारखान्याची आपली संघटना, कामगार व व्यवस्थापन यांच्यामध्ये त्रिपक्षीय वेतन करार करण्याबाबतची चर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, कोल्हापूर येथे दि. १६/०४/२०२६ रोजी दु. ४.०० वा. संयुक्त बैठक बोलावण्यात आलेली आहे. त्यामुळे कामगारांनी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन केले. त्या विनंतीला मान देत कामगारांनी आज आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले.
कामगारांच्या वतीने अशोक शामराव गावडे, चंद्रकांत सखाराम केसरकर, निवृत्ती धाकलू चौकुळकर, पांडुरंग कृष्णा रेडेकर, मल्लाप्पा भिमाणा आतवाडकर, संजय जोतिबा राऊत, व कृष्णा पुंडलिक कांबळे हे उपोषणाला बसले होते. त्यांना कामगार आयुक्त विशाल घोडगे, काँम्रेड उदय नारकर, विजय देवणे यांच्या हस्ते ऊसाचा रस घेवून उपोषण सोडले. यावेळी बहुसंख्य कामगार उपस्थित होते. कामगार प्रदिप पवार यांनी सर्वांचे आभार मानले.



.jpeg)
No comments:
Post a Comment