चंदगड / प्रतिनिधी
चंदगड आगाराची चंदगड-पारगड-मुंबई एसटी बस सेवा अनेक दिवसापासून विविध कारणामुळे बंद होती. सतत च्या पाठपुराव्या नंतर ही सेवा शुक्रवार पासून पुन्हा सुरू करण्यात आली अशी माहिती चंदगड आगाराने दिली आहे. त्यामुळे प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे.
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ. राजश्री लक्ष्मण गावडे व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मण विश्राम गावडे यांनी सुरू झालेल्या बस सेवेचे उद्घाटन केले. याप्रसंगी प्रकाश पाटकर, पांडुरंग पाटकर आदींचा सत्कार करण्यात आला. या कामासाठी कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण अध्यक्ष कृष्णकांत शिंदे, रघुवीर शेलार, प्रकाश पाटकर, अंकुश पवार, महादेव पवार, श्रीकांत कांबळे, आप्पाजी गावडे यांनी विशेष कष्ट व प्रयत्न केले. त्याला यश आल्याने नागरिकासह प्रवाशाची सोय झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment