
पारगड मुंबई बस सेवेच्या शुभारंभ प्रसंगी संयोगाचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे, जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावडे व इतर
चंदगड : प्रतिनिधी
सध्या सुरू असलेला लग्नसराई हंगाम तसेच विद्यार्थी व शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या यामुळे प्रवाशांची वाढणारी गर्दी पाहता चंदगड आगाराच्या वतीने स्वारगेट (पुणे), निगडी, परेल (मुंबई), कल्याण, सातारा मार्गावर जादा गाड्या सोडल्या आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांनी केले आहे.
नव्याने सुरू करण्यात आलेल्या बस गाड्या व त्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे- पारगड ते परेल- मुंबई दुपारी २.४०, परेल ते पारगड रात्री ९.१५, चंदगड ते कल्याण सायं.५.५०, कल्याण ते चंदगड सायं.५.५०, चंदगड ते निगडी सायं. ६.४५, निगडी ते चंदगड रात्री ८.००, चंदगड ते स्वारगेट सकाळी ६.३०, स्वारगेट ते चंदगड सायं. ४.३०, चंदगड ते स्वारगेट दुपारी १२.००, स्वारगेट ते चंदगड रात्री ८.००, चंदगड ते सातारा सकाळी ८.३०, सातारा ते चंदगड सायं. ४.३० वाजता. अशा एकूण सहा अतिरिक्त बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या बसमधून प्रवास करून प्रवाशांनी शासकीय सुविधांचा लाभ घ्यावा. असे आवाहन चंदगड आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment