नेसरी : सी. एल. वृत्तसेवा
सांबरे (ता. गडहिंग्लज) येथे एका धार्मिक कार्यक्रमा निमित्त शुक्रवारी (दि. ५) वाटप झालेल्या महाप्रसादामुळे २५० हून अधिक ग्रामस्थ, नातेवाईक तसेच परिसरातील भक्तांना अन्नबाधा झाली. शुक्रवारी सकाळी एक वाजता महाप्रसाद वाटप झाला. यानंतर दोन तासानंतर भक्तांना त्रास सुरू होण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. गावातील भक्तांनी नेसरी, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, कोवाड सरकारी रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयांचा आधार घेऊन उपचार करून घेतले. त्रास सुरू झालेल्या भक्तांच्या नातेवाईकांची ही धावपळ उडाली. बेळगाव येथील के एलई संस्थेच्या पाच रुग्णवाहिका तातडीने सांबरे येथे दाखल झाल्या.
दरम्यान चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून सदर घडलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.

No comments:
Post a Comment