सडा, मुरगाव (गोवा) येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा वर्धापन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2025

सडा, मुरगाव (गोवा) येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा वर्धापन उत्साहात

कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांचे अभिनंदन करताना अजित कांबळी, सौ श्रद्धा महाले, नितीन फळदेसाई, सुजय देसाई, अमित दळवी, सत्यविजय नाईक, देवराज राणे व राजाराम पाटील.

गोवा : सी एल वृत्तसेवा 

   दत्तजयंती हा भक्तांच्या मनामनात असलेल्या श्रध्देचा, भक्तीचा व अंतर्मुख साधनेचा एक दिव्य उत्सव म्हणून मानला जातो. श्रध्दा, संयमाची प्रेरणा देणाऱ्या श्री दत्त जयंतीच्या पुर्व संध्येला बुधवार दि. ०३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सडा, मुरगाव येथील स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या तिसऱ्या पुतळा स्थापना वर्धापन दिनानिमित्त मुरगाव तालुक्यातील शिवप्रेमी मावळ्यांचा शिवप्रतिमा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. 

  अखिल गोमंतकीय शिवप्रेमी संघटना, मुरगाव तालुका समन्वय, आग्रा ते राजगड गरुडझेप मोहिम गोवा प्रमुख आणि श्री दत्तात्रय सेवा धाम मंदिर ,सडा यांच्या संयुक्त विद्यमानाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अखिल गोमंतकीय शिवप्रेमी संघटनेचे पदाधिकारी, सत्यविजय नाईक, सुजय देसाई, राजाराम पाटील व सौ श्रध्दा महाले- शेट्ये यांच्या सह श्रमदानविर अजित कांबळी , बजरंग दल प्रमुख नितीन फळदेसाई, कला शक्ती नृत्य संस्था कुठ्ठाळी चे नाट्य दिग्ददर्शक अमित दळवी आणि गोमंतकातील दुरवाहिनी चॅनेल व यु ट्युब चनेलच्या वार्ताहर सौ शलाका कांबळी इ. मान्यवरांच्या उपस्थित छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळा पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

   छत्रपतींच्या इतिहासाचा आढावा घेत देवराज राणे यानी सुत्र संचालन केले. गोमंतकातील मंदिरे, त्यांची सेवा कार्यपध्दती आणि श्रमदानाने उभारलेल्या श्री दत्तात्रय सेवा धाम मंदिर यांची सेवा कार्यपध्दती यातील फरक अजित कांबळी यांनी आपल्या प्रस्तावनेत केला. श्रीकृष्णाने शौर्याने नरकासुराचा वध केला. पण आपली मुलं शौर्य वा पराक्रमाचा आदर्श घेण्या ऐवजी नरकासुर प्रतिमा बनवुन विकृत प्रवृती दाखवण्यात दिवाळीच्या पुर्वसंध्येला मग्न असतात. असे नितीन फळदेसाई यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. 

   हिंदवी स्वराज्याचे वैभव म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील गडकोट किल्ले, याची जाणिव गोमंतकातील लहान मुलामुलींना व विद्यार्थ्याना आहे. हे आपण आयोजित केलेल्या 'किल्ले बनवा' या पहिल्याच स्पर्धेत दिसून आले. पुढील वर्षी गोमंतकातील शिवप्रेमी मावळे नरकासुर बनवण्या ऐवजी किल्ले बनवण्यात पुढे असतील.

 या वर्षी बारा तालुक्यामधील सर्वात जास्त सहभाग मुरगाव तालुक्यातील शिवप्रेमीनी दाखवला. असे सत्यजित नाईक यांनी सा़गितले. किल्ला बनवा स्पर्धेत १) श्री दत्तात्रय सेवा धाध मंदिर सडा मुरगाव, २) युवक संघ विद्यालय सडा मुरगाव, ३) माता सेकंडरी स्कुल बायना संभाजीनगर, ४) वाडेनगर इंग्लीश स्कुल नवेवाडे संभाजीनगर, ५) श्री हनुमान संस्थान नवेवाडे संभाजीनगर,६) श्री म्हालसा नारायणी बाईज नवेवाडे संभाजीनगर, ७) शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय सांकवाळ, ८) म्हालसा नारायणी मुलींचा समुह, झुआरीनगर सांकवाळ आदी मंडळांनी सहभाग घेतला. याशिवाय वैयक्तिक १) कुमार बाळकृष्ण दळवी (कुठ्ठाळी), २) हेमंत फडते (दाबोली) ३) कुमारी सान्वी पाटील (सांकवाळ) आदी मुलांना शिवचातुर्य दिनी आग्रा येथे पोवाडा, शौर्य गिते सादरीकरण शिवप्रेमी कलाकार राजेंद्र केरकर, नंदकुमार नारुलकर, अशोक मांद्रेकर, कु. सेजल नाईक, कु. वैष्णवी नाईक, कु. तानिया धुरी, श्री मंगेश शेट्ये, श्री सचिन कोरगावकर, अशोक नाईक , व नवनाथ साळवी आदींना मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे स्मृतिचीन्ह प्रदान करण्यात आले. श्री दत्तात्रय सेवा धाम मंदिरील महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment