कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
विद्यामंदिर ढोलगरवाडी शाळेस कै. गोविंद भरमाणा पाटील यांच्या स्मरणार्थ सरपंच सौ. सुस्मिता संजय पाटील व संजय गोविंद पाटील यांच्याकडून टेबल खुर्च्या देणगी स्वरुपात प्रदान करण्यात आल्या.
फर्निचर प्रदान प्रसंगी उपसरपंच प्रा. दिपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ. वैशाली तुपारे, सौ. शोभा कांबळे, चंद्रकांत सुतार, शा. व्य. समितीचे अध्यक्ष रवींद्र टक्केकर, उपाध्यक्ष सौ. सविता पाटील, सदस्या सौ. वृषाली पाटील, सेवा सोसायटीचे चेअरमन गावडू पाटील, व्हा. चेअरमन प्रकाश भोगूलकर, तंटा मुक्त अध्यक्ष के. टी. पाटील, माजी सैनिक बाबुराव कदम, माजी सरपंच व्हनाप्प्पा तुपारे, शा. व्य. स. माजी अध्यक्ष अभिजित पाटील, आरोग्य सेविका नम्रता सावंत, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जानबा पाटील यांनी देणगीदारांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सुनील फडके, सौ. मनीषा सावंत यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment