हेरे येथे गोवा बनावटीच्या मध्यसाठ्यासह ५ लाख ८८ हजार ९६० रुपयाचा मुद्देमाल वाहनासह जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2025

हेरे येथे गोवा बनावटीच्या मध्यसाठ्यासह ५ लाख ८८ हजार ९६० रुपयाचा मुद्देमाल वाहनासह जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

  


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    पारगड - हेरे रोडवर हेरे (ता. चंदगड) गावच्या हद्दीत राज्य शुल्क उत्पादन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाहनाची तपासणी करत असताना पालगड कडून हेरे गावाकडे भरधाव येणारी काळा काचा असलेली होंडा सिटी चार चाकी कार दिसून आली. या वाहनाला शिताफीने अडवून त्याची सखोल तपासणी केली असता या वाहनाच्या मागील डिक्की मध्ये गोवा बनावट विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या एकूण ३९६ सिलबंद बॉटल्स   (१५ बॉक्स) मिळून आल्या. होंडा सिटी चार चाकी वाहनासह गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले विदेशी मध्य असे एकूण ५ लाख ८८ हजार ९६० किमतीचा दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आला आहे. 

        या प्रकरणी सुखदेव बाळासो कट्टीकर (वय वर्षे 24, रा. मालगाव, ता. मिरज जि. सांगली) व प्रमोद संभाजी हंडीफोड (वय 26, रा. लक्ष्मी नगर , ता. मिरज, जि. सांगली) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        सदर कारवाईत दुय्यम निरीक्षक संदीप जाधव, दुय्यम निरीक्षक हरिभाऊ लांडे व जवान राहुल शिंदे, किरण बागुल, तुषार पवार, हर्षवर्धन भोसले यांचा सहभाग असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास संदीप जाधव दुय्यम निरीक्षक सीमा तपासणी नाका शिनोळी (ता. चंदगड) हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment