मुंबई / विशेष वृत्तसेवा दि. २५-१२-२०२५
कोल्हापूर शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, मनसे उपजिल्हा प्रमुख प्रताप पाटील व अॅड. महेश खांडेकर यांनी बाळासाहेब भवन मुंबई येथे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या प्रयत्नातून चंदगड तालुक्यातील शिवसेना उ. बा. ठा गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, तसेच मनसे उपजिल्हा प्रमुख प्रताप पाटील, अँड. महेश खांडेकर यांनी आज बाळासाहेब भवन मुंबई येथे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाठ, शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे, मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर, तालूका प्रमुख कल्लापा निवगिरे तसेच पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment