कवितेचे नाव - 'होडी', कालकुंद्री येथे कविता लेखन स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावलेली सुंदर कविता - चंदगड लाईव्ह न्युज

14 July 2021

कवितेचे नाव - 'होडी', कालकुंद्री येथे कविता लेखन स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावलेली सुंदर कविता

होडी


कवितेचे नाव 'होडी' 

कालकुंद्री, ता. चंदगड येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय आयोजित कविता लेखन स्पर्धेत चौथा क्रमांक विजेती कविता - 'होडी' 

चंदगड तालुक्याची जीवनदायिनी 'ताम्रपर्णी नदी' गेली हजारो वर्षे नदीकाठावरील चराचराची निरपेक्ष भावनेने सेवा करत आहे. याच नदीवर कालकुंद्री- कोवाड गावांदरम्यान नदीवरून ये-जा करण्यासाठी असलेल्या होडी चे ( 'नाव' /चंदगडी भाषेत 'डोण' ) आत्मकथनपर भाव दाखवणारी भावसुंदर कविता.

   ताम्रपर्णी मातेच्या संगतीत राहून त्रास सहन करूनही या होडीमध्ये सुद्धा परोपकाराची भावना जागृत झाल्याचे चित्रण या कवितेतून नवोदित कवीने केले आहे.


होडी


 कोणीही यावे अंगावरती बसावे

 चल म्हणूनी जोराने हाकावे

 काठाला धडकवूनी

ओसाड सोडूनी जावे 


सकाळच्या प्रहरी करावी चढाओढ 

कधी या तिरी कधी त्या तिरी

दुपारच्या प्रहरी नसे माझ्या परी

 संध्याकाळी चालुनी येई परत सकाळ 


कोणा ना कळे माझा प्रवास

 झोपेतूनही चालावे पैल तीरावर

 अर्धे अंग पाण्यात अर्धे हवेत

 जशी सुख-दुःखे एकमेकांत


खळखळूनी हसावे, रडावे 

सोबती माझी तम्रपर्णी माता

 कोणावरी ना रागवावे, ना रुसावे

 बोले माझी तम्रपर्णी माता.


                               कवी : सागर बाजीराव पाटील

                         कालकुंद्री, ता. चंदगड जि. कोल्हापूर

No comments:

Post a Comment