हंडे चोरांचा धुमाकूळ, १२ शेतकऱ्यांचे हंडे, कोंबडे, कोंबड्या ही लंपास - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2025

हंडे चोरांचा धुमाकूळ, १२ शेतकऱ्यांचे हंडे, कोंबडे, कोंबड्या ही लंपास

 


नेसरी : सी एल वृत्तसेवा

    नेसरी येथूनच जवळ असलेल्या अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज ) येथे तांब्याचे हंडे चोरणाऱ्या चोरांनी आठवड्यात दोन वेळा चोऱ्या करून १२ शेतकऱ्यांच्या घरातील हंडे व कोंबड्या लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  गुरुवार दि. २६ जून रोजी मध्यरात्री गोविंद ग. पाटील, मारूती कृष्णा पाटील, दादू पाटील यांच्या घरातील तांब्याचा हंडा, दयानंद रा. पाटील यांची तांब्याची कळशी व बळवंत पाटील यांची एक कोंबडा व कोंबडी चोरट्यांनी  लंपास केली. यानंतर पुन्हा गुरुवार दि. 3 जुलै रोजी मारूती दोरूगडे, दत्ता दोरूगडे, पिराजी नाईक, गुंजापा नाईक, बाळू आंबुलकर व हूलजी वाईंगडे यांच्या घरातील तांब्याचे हंडे चोरट्यानी लंपास केले. योगायोग म्हणजे या दोनही वेळच्या चोऱ्या गुरुवारी रात्रीच करण्यात आल्या आहेत. नेसरी पोलिसांनी याची वेळीच दखल घेऊन या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी  ग्रामस्थांनी केली आहे.

     एकंदरीत नेसरी पोलिसांनी या भुरट्या चोरांचा छडा लावण्यासाठी  वेगळे प्रयत्न करावेत. अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment