करंजगाव येथे एक दिवस माझ्या बळिराजासाठी कार्यक्रम, काजू फळझाड प्रात्यक्षिक, कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना दिली विविध योजनांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2025

करंजगाव येथे एक दिवस माझ्या बळिराजासाठी कार्यक्रम, काजू फळझाड प्रात्यक्षिक, कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना दिली विविध योजनांची माहिती

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    करंजगाव (ता. चंदगड) येथे आज मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कार्यक्रम अंतर्गत राजश्री शाहू महाराज जयंती पंधरवडा मध्ये नामदार प्रकाश आबिटकर पालकमंत्री कोल्हापूर यांचा अभिनव उपक्रम महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालूका  कृषि अधिकारी कार्यालय चंदगड  यांच्या संयुक्त विद्यमानाने "एक दिवस माझ्या बळिराजासाठी" कार्यक्रमा अंतर्गत कामांना पुन्नप्पा कांबळे यांच्या प्रक्षेत्रावर CRA फळबाग लागवड तंत्रज्ञानाचा वापर करून काजू फळझाड प्रात्यक्षिक गडहिंग्लजचे उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील  यांनी दाखवले व माहिती दिली.

          या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या दूध डेअरी संघ भेट व दूध संकलन विषयी माहिती घेतली, समस्या ऐकल्या व त्यावरील चर्चा केली. तसेच फळबाग लागवड  योजनाची माहिती दिली. नैसर्गीक शेती मिशन अंतर्गत गावातील शेतकरी गट यांच्यासोबत चर्चा केली. पी. एम. किसान योजनेच्या लाभार्थी सोबत चर्चा केली व आग्रिस्टॅक व खरीप पिक विमाची प्रचार प्रसिध्दी केली. महाडीबीटी प्रचार प्रसिद्धी केली. वृक्षारोपण अंतर्गत काजूच्या रोपांची लागवड केली. पी.एम.एफ.एम.ई योजने अंतर्गत अश्विन जाधव यांच्या काजू प्रक्रिया युनिटला  करंजगाव ग्रामस्थ सोबत भेट देवून माहिती घेतली. 

     यावेळी सहायक कृषी अधिकारी शुभम पाटील, सरपंच अनिता गावडे, उपसरपंच सदानंद गुरव, कृषी मित्र देवाप्पा गावडे, पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट करंजगाव व ग्रामस्थ, आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment