चंदगडच्या विद्यार्थ्यांसाठी आमदारांचा मायेचा सावलीदार उपक्रम, दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये २४० छत्र्यांचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2025

चंदगडच्या विद्यार्थ्यांसाठी आमदारांचा मायेचा सावलीदार उपक्रम, दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये २४० छत्र्यांचे वाटप

 

दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये २४० छत्र्यांचे वाटप उपक्रमावेळी उपस्थित मान्यवर.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        "पावसाच्या सरी, वाऱ्याचे झंझावात, हातात वही-पुस्तकं... आणि डोळ्यांत शिकण्याची आस...!" अशा प्रतिकूल हवामानात दररोज चालत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे आज एक स्त्युत्य उपक्रम राबवण्यात आला. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने एकूण २४० विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

    सौ. भारती जाधव यांनी या उपक्रमाचे स्वागत करत म्हटले, “ही छत्री केवळ पावसापासून संरक्षण देणारी नव्हे, तर शिक्षणासाठी झगडणाऱ्या मुलांवरील प्रेमाची सावली आहे.” या उपक्रमामागे फेसबुक फ्रेंड सर्कलचा प्रेरणादायी सहभाग आहे. संतोष दरेकर आणि अनिल पोतदार (पोतदार ज्वेलर्स, बेळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आकाराला आला.

    अनिल पोतदार म्हणाले, “या कार्यामध्ये तत्त्व आहे, समाजभान आहे, संवेदनशीलतेचा स्पर्श आहे. अशा आमदाराचा तालुक्याला लाभ हा भाग्याचा विषय आहे.” शालेय समितीचे अध्यक्ष ॲड. प्रा. एन. एस. पाटील यांनीही भावना व्यक्त करत सांगितले, “ही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर आलेली हिरवीगार सावली आहे.” प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल म्हणाले, “या छत्र्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनावर उमटणारा एक सकारात्मक स्पर्श आहे.”

        संतोष दरेकर यांनी भावनिक शब्दांत सांगितले, “या कार्यक्रमामागे असलेली संवेदना शब्दांत मावणार नाही; ही आपुलकी मनात कोरून ठेवावी लागेल.” या उपक्रमांतर्गत सुळये, कोळींद्रे, नागवे, कोकरे, श्रीपादवाडी, पेडणेकर वाडी, अडूरे, किरमटेवाडी, न्हावेली, उमगाव, भोगोली, कानूर, बिजूर, बुझवडे, कुरणी, शिरगाव, हंबिरे, सोनार वाडी, फाटक वाडी, हिंडगाव, काजिर्णे, म्हाळूंगे आदी २२ गावांतील विद्यार्थ्यांना छत्र्या वितरित करण्यात आल्या.

    कार्यक्रमास प्राचार्य आर. पी. पाटील, डॉ. एस. डी. गोरल, व्ही. एन. कांबळे, टी. व्ही. खंडाळे, वर्षा पाटील, एस. व्ही. वर्पे, शरद हदगल, विद्या डोंगरे, भाग्यश्री पाटील, विद्या शिंदे, ओंकार पाटील, वैशाली पाटील, नामदेव शिवणगेकर, पवन पाटील, हणमंत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले व आभार व्ही. के. गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment