कोवाड : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त गावातून वारकरी दिंडी काढण्यात आली. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्माई, वारकरी यांची वेशभूषा करून पालखी, भगव्या पताका, विना, टाळ, चिपळ्या घेऊन गावातून दिंडी काढली.
श्रीराम मंदिर येथे वारकरी संप्रदाय कोवाड यांच्या वतीने दिंडीतील विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव यांच्यासह सर्व सदस्य, मुख्याध्यापक जानबा अस्वले, अध्यापक श्रीकांत आप्पाजी पाटील, गणपत लोहार, भावना अतवाडकर, कविता पाटील सरवणकर, जयमाला पाटील व मधुमती गावस आदींची उपस्थिती होती. या उपक्रमाबद्दल बाजारपेठ मधील व्यापारी, ग्रामस्थ यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment