"वारकरी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा" आमदार शिवाजीराव पाटील, चंदगड मतदारसंघासह कुद्रेमानी येथील वारकरी भक्तांना पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2025

"वारकरी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा" आमदार शिवाजीराव पाटील, चंदगड मतदारसंघासह कुद्रेमानी येथील वारकरी भक्तांना पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    पंढरीचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद, विठ्ठल नामस्मरण, आणि वारकऱ्यांची भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली दिंडी! याच आषाढी वारीच्या निमित्ताने बेळगाव  तालुक्यातील कुद्रेमानी गावातील विठ्ठलभक्त वारकरी मंडळींची पंढरपूरमध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांनी सदिच्छा भेट घेतली.

    यावेळी आमदार भाऊंनी वारकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत, त्यांच्या भक्तिभावाचे व त्यागमय सेवाभावाचे मन:पूर्वक कौतुक केले. "वारकरी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. त्यांच्या नित्यनेमाने वारीतल्या सहभागामुळेच आपल्या संस्कृतीचं दर्शन पिढ्यान्-पिढ्यांना घडत आहे," असे गौरवोद्गार आमदार पाटील यांनी काढले.

    या भेटीदरम्यान कुद्रेमानी येथील वारकरी मंडळींची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यामध्ये:

🔸 बाळाराम कदम

🔸 सुरेश विठ्ठल पाटील

🔸 शिवाजी महादेव गुरव

🔸 गावडू संभाजी पाटील

🔸 नाना मारुती पाटील

🔸 शांताराम बळवंत गुरव

🔸 परशुराम काकतकर

🔸 बबन गुरव

🔸 संतोष पाटील

🔸 लक्ष्मण व्हन्नाप्पा पन्हाळकर

🔸 निंगाप्पा नाईक

    या सर्वांना आमदार पाटील यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या विठ्ठलभक्तीला साष्टांग नमस्कार केला.

    विठोबाच्या चरणी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत, आमदार पाटील यांनी चंदगड तालुक्यातील इतर वारकरी दिंड्यांनाही सदिच्छा भेटी देत आपला सांस्कृतिक, आध्यात्मिक व सामाजिक ऋणानुबंध अधिक दृढ केला.

No comments:

Post a Comment