चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
शालेय साहित्य सहकार्यकडून... दुर्ग संवर्धनाकडे..... घेतला_वसा_दुर्गसंवर्धन_चळवळीचा. या संकल्पनेतून चंदगड तालुक्यातील गंधर्वगड पायथ्याला असलेल्या वाळकुळी गावात मराठी विद्या मंदिर वाळकुळी व मराठी विद्या मंदिर आडूरे या शाळेत विद्यार्थ्यांसाठी_शालेय_साहित्य_वाटप करण्यात आले.
यावेळी या कार्यासाठी शालेय साहित्य व आर्थिक मदत देणाऱ्या प्रत्येक देणगीदाराचे सह्याद्रीचे दुर्गसेवकांनी ऋण व्यक्त केले. यावेळी संतोष मालुसरे, तेजस चौगुले, पंकज कोकितकर, तुषार चांदेकर, स्नेहल पिळणकर, गोविंद मासरणकर उपस्थिती होते.
No comments:
Post a Comment