कोवाड : सी एल वृत्तसेवा
मौजे दुंडगे (ता. चंदगड) येथील महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत शेतकरी भारत नरसु पाटील यांच्या शेतात चार सुत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली. यामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर (गिरिपुष्प), युरिया ब्रिकेटचा वापर, नियंत्रित अंतर या सूत्रांचा प्रत्यक्षात वापर करत मंडळ कृषी अधिकारी कुंभार व उपकृषी अधिकारी संतोष खुटवड यांनी मार्गदर्शन केले. तसेच कोवाड मंडळ मधील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी अतुल मुळे, पूजा जाधव, किरण पाटील, गोपाळ गव्हाळे, सुधाकर मुळे, अतिश चव्हाण तसेच दुडगे गावच्या कृषी सेवक तेजस्विनी भिंगूडे ,प्रियंका डफरे ,तेजस वांद्रे, सिद्धार्थ तांबे यांनी शेतकर्यांच्या संपूर्ण प्लॉट वर चार सूत्रे पद्धतीने प्रात्यक्षिक द्वारे रोप लागण करून दाखवली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment