नागरदळे येथे एक दिवस माझ्या बळिराजासाठी" उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2025

नागरदळे येथे एक दिवस माझ्या बळिराजासाठी" उपक्रम

 


कोवाड : सी एल वृत्तसेवा 

         नागरदळे येथे शनिवारी (दि. 5 ) मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कार्यक्रम अंतर्गत राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त पंधरवडा मध्ये नामदार प्रकाश आबिटकर पालकमंत्री कोल्हापूर यांचा अभिनव उपक्रम महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालूका  कृषि अधिकारी कार्यालय चंदगड  यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवस माझ्या बळिराजासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. 

          यावेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, भारती जाधव,  समन्वयक अधिकारी व आत्मा उपसंचालक कोल्हापूर रविन्द्र तांगट, माजी सभापती यशवंत सोनार,  मंडल कृषी अधिकारी कुंभार साहेब, उपकृषी अधिकारी खूटवड, सहायक कृषी अधिकारी किरण पाटील, सहायक कृषी अधिकारी गोपाळ गव्हाळे, सरपंच वर्षा राणी पाटील,  उपसरपंच एकनाथ पाटील, महिला सदस्या व शेतकरी उपस्थित होते.

या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना विश्वनाथ कोकीतकर यांच्या भात शेती  प्लॉट मध्ये चार सूत्रे भात लागवड करण्यात आली. याचे प्रात्यक्षिक मंडळ कृषी अधिकारी कुंभार व सहायक कृषी अधिकारी किरण पाटील यांनी दाखविले. तसेच रविद्र तांगट (आत्मा उपसंचालक कोल्हापूर) यांनी उपस्थित शेतकरी यांना भात पिकावरील कीड व रोग याबद्दल माहिती देण्यात आली. शेतकर्‍यांच्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली.

    यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक किरण पाटील (सहाय्यक कृषी अधिकारी,  नागरदळे)  यांनी केले. आभार पुंडलिक पाटील  यांनी मानले.

No comments:

Post a Comment