चंदगड : दि. २०-१२-२०२५
चंदगड शहर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या व पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. काल रात्री बिबट्याने चंदगड शहरापासून अवघ्या १ किलोमीटर दूर असलेल्या देसाईवाडीत कुत्र्यावर हल्ला केला. त्यामुळे हा बिबट्या आता चंदगड शहरातही येण्याची भिती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेची चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी गांभीर्याने नोंद घेत चंदगड विभागातील वन अधिकाऱ्यांशी संवाद साधला व संबंधित घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी वन अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
वन अधिकाऱ्यांनीही यावर सकारात्मक भूमिका घेत चंदगड शहरातून दररोज संध्याकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त सुरु करण्यात येईल असे सांगितले त्याचबरोबर नागरिकांमध्ये वन्य प्राण्यांपासून बचावासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले.

No comments:
Post a Comment