नेसरी येथील सामाजिक कार्य समितीतर्फे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, ब्रदर व इतर कर्मचाऱ्यांचा तत्पर सेवेबाबत सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2025

नेसरी येथील सामाजिक कार्य समितीतर्फे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, ब्रदर व इतर कर्मचाऱ्यांचा तत्पर सेवेबाबत सत्कार

नेसरी येथील सामाजिक कार्य समितीतर्फे ग्रामीण रुग्णालय स्टाफचा सांबरे घटनेतील रुग्णांचा तत्पर सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.
नेसरी  / सी एल वृत्तसेवा

    सांबरे (ता. गडहिंग्लज) येथील महाप्रसादातून झालेल्या विषबाधेत अनेक बालके, महिला व ग्रामस्थांना तातडीने उपचार देत जीव वाचवणाऱ्या नेसरी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, ब्रदर व इतर ३३ सेवकांचा नेसरीतील सामाजिक कार्य समितीतर्फे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  अध्यक्षस्थानी समितीध्यक्ष गोविंदा नांदवडेकर तर  प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती गुरूदास भिकले होते. 

        स्वागत बापूसाहेब घवाळे यांनी केले. रवींद्र हिडदुगी यांनी प्रास्ताविक करून सामाजिक कार्य समितीच्या कार्याचा आढावा घेतला. रुग्णालयातील डॉ. सुरेश कदम, डॉ. प्रशांत चौगुले, डॉ. सत्यजित देसाई, डॉ. सचिन शिंदे यांच्यासह ३३ सेवकांचा समितीतर्फे सन्मान करण्यात आला. या उपक्रमाला स्थानिक पातळीवरून मोठी प्रशंसा मिळाली.

    गुरूदास भिकले यांनी डॉक्टर-स्टाफच्या झटपट सेवाभावी कार्याचे कौतुक करून अशा सामाजिक सन्मान उपक्रमांनी सेवाभावी कार्याला नवी प्रेरणा मिळते असे सांगितले. डॉ.  कदम व डॉ. देसाई यांनी विषबाधेची गंभीर स्थिती, रुग्णांची वाढती संख्या आणि स्टाफने झोकून दिलेल्या सेवेमुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगितले. यावेळी राजाराम सावंत, मिलिंद गुरव, विजय गुरबे, कपिल मूळे, यांनी मनोगते व्यक्त केली.

     कार्यक्रमाला अमोल बागडी, अभिजित कुंभार, मार्तंड कोळी, बाळासाहेब नावलगी, शावेर फर्नांडिस, प्रल्हाद माने, सतीश खराबे, दिलीप कोळी, सुरेश गवळी, वंदना नांदवडेकर, शिवलीला हिडदुगी, माधुरी कुंभार, शुभांगी शिंदे आदींसह रुग्णालयाचा स्टाफ उपस्थित होता. टी. बी. कांबळे यांनी सूत्रसंचालन तर समारोप विश्वास रेडेकर यांनी केला.

No comments:

Post a Comment