अथर्व-दौलत साखर कारखान्याचे १६ ते ३० नोव्हेंबर अखेरचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा - चेअरमन मानसिंग खोराटे - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2025

अथर्व-दौलत साखर कारखान्याचे १६ ते ३० नोव्हेंबर अखेरचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा - चेअरमन मानसिंग खोराटे

दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लि., कोल्हापूर लिज्ड युनिट दौलत साखर कारखान्याचा 2025-26 चा गळीत हंगामाची सुरुवात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून यशस्वीरित्या सुरु झाली असून आज अखेर कारखान्याने 1 लाख 23 हजार 500 मे. टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. 2025-26 चा गळीत हंगाम मधील दिनांक 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरअखेर ऊस उत्पादकांकडून कारखान्याकडे आलेल्या 51,583.780 मे. टन ऊसाला प्रतिटन 3,400 रुपये दराने होणारी एकूण 17 कोटी 53 लाख 84 हजार 837 रुपयांची रक्कम संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज रोजी जमा करण्यात आली आहे.

    शेती विभागाच्या योग्य नियोजनामुळे ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा सक्षमपणे कार्यरत असून, तोडणी मजूर, वाहतूक व्यवस्था आणि ऊस पुरवठा सुरळीतपणे सुरु आहे. याबाबत भागातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

    अथर्व दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितले की, 2019 पासून दौलत साखर कारखाना कार्यान्वित झाल्यापासून वेळच्या वेळी ऊस बिले अदा करण्याची परंपरा कायम आहे. ही परंपरा यावर्षीही सुरू राहणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वाहतूक कंत्राटदार व कामगार यांच्या सहकार्यातून कारखाना उत्तमरीत्या सुरू आहे. तरी शेतकऱ्यांनी आपला घामातून पिकवलेला संपूर्ण ऊस अथर्व-दौलत साखर कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले. वेळेत ऊस बिले अदा करणे, नियोजनबध्द गाळप आणि शेतक-यांचे विश्वासाचे नाते जपल्या मुळे अथर्व-दौलत साखर कारखाना परिसरातील ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केला आहे.``

    त्यावेळी कारखानाच्ये संचालक विजय पाटील, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, फायनान्स मॅनेजर सुनील चव्हाण, शेती अधिकारी युवराज पाटील, लेबर ऑफिसर अश्रू लाड व दयानंद देवाण  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment