चंदगड : सी एल वृत्तसेवा
रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम- बेळगाव यांच्या माध्यमातून व मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न, चंदगड तालुका पत्रकार संघ तसेच कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडिया परिषद यांच्या सहकार्याने समाजातील गरजू गरीब श्रवणदोष असलेल्या व्यक्तींना श्रवण यंत्र (कान मशीन) वाटप शिबिर कालकुंद्री (ता. चंदगड) येथील आजी-माजी सैनिक भवन सभागृहात नुकतेच पार पडले.
या शिबिराचा लाभ चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल तालुक्यांसह कर्नाटकातील हुक्केरी व बेळगाव तालुक्यातील श्रवणदोष मुळे कमी ऐकू येणाऱ्या ५० गरजू नागरिकांनी घेतला. सर्व लाभार्थी रुग्णांची तपासणी करून श्रवण यंत्र (कान मशिन) वाटप करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव चे माजी अध्यक्ष व सेवानिवृत्त नौदल अधिकारी रोटरियन अशोक क. पाटील (कालकुंद्री) हे होते. चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक पुढारी चे पत्रकार श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. यावेळी उपस्थित रोटरी क्लब चे पदाधिकारी आरोग्य विभागाचे डॉक्टर व मान्यवरांचे स्वागत पत्रकार संघाचे सदस्य संदीप तारीहाळकर, सचिन तांदळे आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष शरद जोशी, सदस्य सुरेश पाटील, विष्णू पाटील, विजय पाटील, मारुती वर्पे यांनी केले. यावेळी रोटरी क्लबचे मेंटॉर अरविंद खडबडी यांनी श्रवण यंत्र कसे वापरावे, ते खराब होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी? याबाबत सविस्तर माहिती दिली. कोणतीही वस्तू मोफत मिळाली की त्याचे महत्त्व दुर्लक्षित होते. म्हणून या मशीन साठी नाममात्र शुल्क आकारले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सैनिक संघटना अध्यक्ष शरद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ वेनूग्राम चे पदाधिकारी रोटरीयन चंद्रकांत राजमाने, किशोर जगदाळे, मिलिंद जाधव, बंकट पवार, नंदन उप्पिन, महादेव गिड्डोली आदींसह जि.प. समुदाय आरोग्य अधिकारी अदिती पाटील उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात अशोक पाटील यांनी सुमारे ३० ते ५० हजार रुपये किमतीच्या महागड्या मशीन ग्रामीण भागातील सर्व सामान्य गरीब लोकांना विकत घेणे शक्य होत नाही. म्हणून त्यांच्यासाठी केवळ सॉफ्टवेअर डाऊनलोड व बॅटरी ची नाममात्र किंमत घेऊन या मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन व नियोजन करण्यासाठी पत्रकार व सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीकांत पाटील (कालकुंद्री) यांचे योगदान मोलाचे ठरल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर पाटील सांबरेकर, रमेश य. पाटील, शिवाजी पाटील, सुशांत पाटील, अर्जुन परीट, तातोबा पाटील, आरोग्य सेवक विकास पाटील, आरोग्य सेविका आर्चना कांबळे, रेणुका कांबळे, अशा सेविका माया पाटील, सुमन सकट, अंजना पाटील, लक्ष्मी उंदरे आदींचे सहकार्य लाभले.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)


No comments:
Post a Comment