![]() |
| कार्यक्रमास उपस्थित जाधव, जोशीलकर, श्रीम. अरूणा हसबे, डॉ. मीना शेंडकर, श्रीम. सुवर्णा पवार, सुबराव पवार व मुख्याद्यापक डॉ. गजानन खाडे गुरूजी, पै. विष्णू पत्की, सौ. संध्या |
कोल्हापूर : सी एल वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा परिषद संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे सुबराव रामचंद्र पवार यांच्या मातोश्री स्वर्गीय शांताबाई रामचंद्र पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर होत्या. स्वागत सुबराव पवार यांनी केले.
यावेळी बोलताना मीना शेंडकर म्हणाल्या जीवनामध्ये शाळेचे स्थान अनन्यसाधारण आहे. शालेय जीवनातील संस्कारांची शिदोरी आपल्या आयुष्यात अखेर पर्यंत महत्त्वाची ठरते. अशा संस्कारी पिढीत तयार झालेले सुबराव पवार हे एक आहेत. त्यांनी आपल्या आईंच्या स्मरणार्थ १५,०००, चा धनादेश व ७,००० रूपयांची पुस्तके वहया शाळेस दिलेली आहेत. हे योगदान खूप मोठे असल्याचे सांगितले.
याप्रसंगी श्रीमती अरूणा हसबे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. श्रीमती सुवर्णा पत्की (उपअधिक्षक आर्थिक गुन्हा अन्वेषन शाखा) यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकासाविषयी माहीती दिली. मोबाईलचा अतिरेकी वापर अयोग्य आहे हे विशद केले. तसेच आई-वडीलांना देव मानुनच तुम्ही वाटचाल करा असा सल्ला दिला. महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर यांच्या हस्ते, इ. ८ वी मधील पृथ्वीराज मोहीते यांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय कमांक पटकावल्याबद्दल रोख १,०००/- रक्कम देवून सत्कार करून विद्यार्थी जीवनातील खेळ व आरोग्य यांचे महत्व सांगीतले. जेष्ठ कायदेतज्ञ गिरीश नाईक यांनी विद्यार्थ्यांना कायदेशीर सक्षम राहण्याविषयी माहिती दिली.
सुबराव पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाने प्रभावित होऊन उत्स्फूर्तपणे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी वडीलांच्या स्मरणार्थ रू.११,०००, आरोग्य विभागाचे जिल्हा प्रशिक्षण केंद्र सदस्या से.नि. श्रीम. स्मिता दिलीप भोसले यांनी पतींच्या स्मरणार्थ रू.५,०००, वित्त विभागाचे सेवा निवृत्त कनिष्ठ लेखाधिकारी व राजाध्यक्ष, जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी सेवा समिती सुबराव रा. पवार यांनी आई-वडील व सासरे यांच्या समरणार्थ प्रत्येकी रू. ५,००० असे एकूण रू.१५,०००, डॉ. स्मिता सागर बचाटे यांनी रू.११,१११, अनिल विजय लाड (शिक्षक, मेन राजाराम हायस्कुल) यांनी वडीलांच्या स्मरणार्थ रू.५,०००, श्रीम. वनिता अशोक खडके, उपप्राचार्य, मेन राजाराम हायस्कुल यांनी पतींच्या स्मरणार्थ रू. ५,००० चे धनादेश देणगी स्वरूपात जमा केले.
पै. पृथ्वीराज मोहिते याच्या कुस्तीतील यशाबदद्ल सुबराव पवार यांनी रू.१,०००/- रोख बक्षीस दिले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत सुबराव पवार यांनी करताना आपल्या सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहीती दिली.
कार्यकमाचे सुत्रसंचालन श्रीम सुषमा पाटील यांनी केले. बी. पी. माळवे यांनी आभार मानले.
यावेळी जागर फौंडेशन कोल्हापूरचे अध्यक्ष प्रा. बी.जी. मांगले व सर्व सदस्य, सेवानिवृत्त कर्मचारी, पवार कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, इयत्ता ११ वी मधील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment