लकीकट्टे येथील कल्लाप्पा रेडेकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2025

लकीकट्टे येथील कल्लाप्पा रेडेकर यांचे निधन

कलाप्पा भैरू रेडेकर

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

     लकीकट्टे (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते, सीआरपीएफचे निवृत्त जवान कलाप्पा भैरू रेडेकर (वय ८६) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी दि. ११ डिसेंबर २०२५ निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. ते गावातील तंटामुक्त कमिटीचे पहिले अध्यक्ष होते. गावात एक प्रामाणिक पंच म्हणून त्यांचा नावलौकिक होता. रक्षाविसर्जन शनिवारी (दि. १३) सकाळी होणार आहे. लकीकट्टे येथील हनुमान सहकारी दूध संस्थेचे संचालक शामराव रेडेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या काळातच चंदगड तालुक्यात  तंटामुक्त गाव म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.

No comments:

Post a Comment