चंदगड : सी एल वृत्तसेवा
अथर्व दौलत साखर कारखान्याकडून ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी जाहीर करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर २०२५ अखेर पुरवठा केलेल्या ऊसाचे बिल कारखान्याने आज ₹३,४०० रुपये प्रति टन या दराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. यावेळी बोलताना चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितले की, या वर्षी ऊस हंगाम सुरळीत सुरू असून शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दराने पेमेंट देणे ही कारखान्याची प्रामुख्याने जबाबदारी आहे. ₹३,४०० रुपये प्रति टन निश्चित केल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारास मोठा हातभार लागणार असून या रकमेची बँक खात्यात थेट जमा प्रक्रिया आज पूर्ण झाली.
यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देत अथर्व दौलत साखर कारखाना प्रशासन सातत्याने पारदर्शक व वेळेवर बिले वितरित करण्याच्या भूमिकेत अग्रेसर आहे. ऊस बिले तात्काळ जमा करण्याच्या कारखान्याच्या धोरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे , तसेच कारखान्याने “शेतकरी प्रथम” हे धोरण पुढील काळातही कायम ठेवण्याचा ग्वाही दिली.
यावेळी मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, जनसंपर्क अधिकारी दयानंद दयानंद देवान, लेबर ऑफिसर अश्रू लाड उपस्थित होते.

No comments:
Post a Comment