बुक्कीहाळ बुद्रुक येथील शिक्षक पी. व्ही. पाटील यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

15 December 2025

बुक्कीहाळ बुद्रुक येथील शिक्षक पी. व्ही. पाटील यांना पितृशोक

व्हन्नाप्पा लगमाना पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      बुक्कीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) येथील लक्ष्मी सहकारी दूध संस्थेचे माजी सेक्रेटरी व्हन्नाप्पा लगमाना पाटील (वय 88) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि. 15) डिसेंबर 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. होसूर (ता. चंदगड) येथील ना. सी. पाटील हायस्कूलचे शिक्षक पी. व्ही. पाटील, बंगलोर येथील इंजिनिअर संजय पाटील, प्रगतशील शेतकरी विजय पाटील यांचे ते वडील होय. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तर गुरुवारी दि. 18 रोजी रक्षा विसर्जन होणार आहे.

No comments:

Post a Comment