चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
मूळचे चिंचणे (ता. चंदगड) व सध्या कोल्हापूर येथील आदिवासी महादेव कोळी संघर्ष समितीचे विभागीय अध्यक्ष व कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध गौराई क्लासेसचे चेअरमन प्रा. बसवंत पाटील यांचे वडील मल्लाप्पा भरमाणा पाटील (मुळ गाव बुक्कीहाळ, रा. चिंचणे, ता. चंदगड, वय 94) यांचे सोमवारी (दि. 15) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सरळमार्गी, प्रामाणिक, सुस्वभावी मल्लाप्पा पाटील यांचा जन्म 21 डिसेंबर, 1931रोजी आदिवासी महादेव कोळी कुटुंबात झाला. लहानपणी आईवडिलांचे छत्र हरवलेल्या मलाप्पा यांचे पालन पोषण सख्खी बहीण दुधवा हणमंत पाटील हिने केले. अत्यंत हालाखीची परिस्थिती असल्याने पहिली पर्यंतचे शिक्षण घेऊन पोटापाण्यासाठी लोकांची चाकरी, कधी जंगलतोड, कोळसा काढणे अशी अत्यंत कष्टाची कामे व व्यवसाय करत स्वतःचे उदरनिर्वाह करणाऱ्या पाटील यांचा विवाह चिंचणे येथील गौराबाई बसवंत पाटील हिच्याशी झाला. त्यांना मलप्रभा व बसवंत अशी दोन अपत्य जन्मली. अत्यंत खडतर परिश्रमातून दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. प्रा. बसवंत पाटील यांनी इंग्रजी विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अतिशय ब्रिलियंट म्हणून त्यांची ख्याती आहे. यूपीएससीची परीक्षा पास होऊनही ते केवळ आदिवासी महादेव कोळी जातीचा नसल्याने स्पर्धेतून बाहेर गेले. तरीही त्यांनी अभ्यासाची संगत सोडली नाही. आपल्या समाजाला न्याय मिळावा या सामाजिक भावनेतून त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक राजकीय आंदोलनात सक्रिय भाग घेतला आहे. त्यांच्या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाला घ्यावा लागली. इंग्रजीवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व असल्याने शासन दरबारी त्यांचा दबदबा आहे. बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील सहाय्यक वजन मापक विठ्ठल लक्ष्मण कोळी हे प्रा. बसवंत पाटील यांचे सासरे होत. प्रा. बसवंत यांची गौतमीं ही कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेजमध्ये वकिलीच्या शेवटच्या वर्षाला आहे. माती सारणे विधी गुरुवारी दि 18 डिसेंबर, 2025 रोजी सकाळी 9. 00 वाजता होणार आहे.

No comments:
Post a Comment