चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कोकण विकास सोसायटी, पणजी व दिशा सामाजिक संस्था, चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आयोजित मतदान जनजागृती अभियानात दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड च्या विद्यार्थ्यांनी प्रभावी, विनोदी आणि ग्रामीण बोलीतील पथनाट्य सादर करून उपस्थित नागरिकांची मने जिंकली.
वुई लिड अभियान चार गावांच्या मध्ये चालू आहे त्यामध्ये ढोलगरवाडी लकीकट्टे, तावरेवाडी, कलिवडे या चार गावांमध्ये अभियान चालू आहे या चार गावांमध्ये लोकसहभागातून गाव विकास या कार्यक्रमांतर्गत माझं नेतृत्व माझ्या गावासाठी माझं नेतृत्व यासाठी प्रयत्न करत आहे.
“मतदार राजा जागा हो” या संजय साबळे लिखित पथनाट्यातून लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व, जागरूक नागरिकत्व आणि जबाबदार मतदानाची गरज प्रभावीपणे मांडण्यात आली.
ग्रामीण भाषेची चव, बोलभाषेतील संवाद, ताल धरायला लावणारी गाणी आणि मुलांच्या रंगतदार अभिनयामुळे परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे दणदणीत स्वागत केले.
या पथनाट्यात मनाली कांबळे, समिधा खोचरे, स्वाती पवार, ऋतूजा शिरोडकर, अनन्या चंदनवाले, साक्षी गावडे, संस्कृती कांबळे, लबीबा गोरेखान आणि तुषार यादव या विद्यार्थ्यांनी प्रभावी भूमिका साकारून मतदानाचा संदेश सर्वत्र पोहोचवला.
कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सरपंच सुष्मिता पाटील उपसरपंच प्रा दिपक पाटील विद्या तावडे व मामासाहेब लाड विद्यालयाचे एम वाय पाटील सर , ग्राम संघाच्या कार्यकर्त्या अस्मिता पाटील, दिशा सामाजिक संस्थेच्या स्वप्नाली पाटील , सेवा सोसायटीचे चेअरमन गावडू पाटील, अंगणवाडी सेविका भारती पाटील, महिला सदस्य शोभा कांबळे, सदस्य चंद्रकांत सुतार, यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीचे आणि सामाजिक जाणिवेचे विशेष कौतुक केले.
पुढे ते म्हणाले, “नव्या पिढीचा असा सहभाग लोकशाहीला बळ देणारा आहे. विद्यार्थ्यांनी केलेली सादरीकरणे नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरतील.” शालेय समिती चेअरमन अॅड. एन. एस. पाटील, प्राचार्य आर. पी. पाटील आणि उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी या उपक्रमाचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
दि न्यू इंग्लिश स्कूलने सामाजिक जाणिवेची भक्कम परंपरा जपत लोकशाही पर्वात दिलेले योगदान जिल्ह्यात अनुकरणीय मानले जात आहे.



No comments:
Post a Comment