थकीत घरफाळा, पाणीपट्टी व चालू घरफाळा एकरकमी भरल्यास थकीत फाळ्यावर 50 टक्के सवलत, चंदगड तालुक्यातील शिनोळी बुद्रुक ग्रामपंचायतने घेतला सर्वप्रथम निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

15 December 2025

थकीत घरफाळा, पाणीपट्टी व चालू घरफाळा एकरकमी भरल्यास थकीत फाळ्यावर 50 टक्के सवलत, चंदगड तालुक्यातील शिनोळी बुद्रुक ग्रामपंचायतने घेतला सर्वप्रथम निर्णय

  


चंदगड : सी एल वृत्तसेवा

    थकीत घरफाळा व पाणीपट्टी एकरकमी व चालू वर्षीचा पूर्ण फाळा भरल्यास मागील वर्षांपूर्वी थकीत घर पाण्यावर 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) ग्रामपंचायतने घेतला. चंदगड तालुक्यात सर्वप्रथम या ग्रामपंचायतने असा निर्णय घेतला आहे.


 याबाबत ग्रामपंचायतने विशेष बैठक घेऊन हा निर्णय घेतला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच गणपत कांबळे होते. व्यासपीठावर उपसरपंच पुंडलिक गवसेकर,  ग्रामविकास अधिकारी महादेव पाटील यांच्यासह

ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण सुतार, नितीन पाटील, परशराम कांबळे, नंदा मेणसे, स्मिता बोकमूरकर, बबीता तानगावडे, चंद्रिका डागेकर, निकिता गुडेकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ दुर्गाप्पा कांबळे, नागेश मेणसे, नारायण बेळगावकर, जोतिबा तानगावडे, म्हातारु बेळगावकर उपस्थित होते. 

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आम्ही हा सवलत देण्याचा निर्णय घेतला. या योजनेतून ग्रामस्थांना हजारो रुपयांचा फायदा होणार आहे. गावात विविध सामाजिक उपक्रम सुरू आहे. या अंतर्गत हा थकबाकी वसूल होण्यासाठीचा उपक्रम सुरू केला आहे.

No comments:

Post a Comment