कर्यात भागासह चंदगड तालुक्यातील कलाकारांना चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्याची मोफत सुवर्णसंधी - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2025

कर्यात भागासह चंदगड तालुक्यातील कलाकारांना चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्याची मोफत सुवर्णसंधी

  


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

          क्रिएशन, शाखा बेळगाव प्रस्तुत निर्माता कुमार जाधव, राजेंद्र जैन व भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ लघु चित्रपट या लघु चित्रपटासाठी आपल्या किणी कर्यात भागातील तसेच चंदगड तालुक्यातील नृत्य, गायन व अभिनयाची आवड असलेल्या बालकलाकार व प्रौढ कलाकार यांना मराठी, हिंदी व कन्नड चित्रपट मालिका क्षेत्रात पदार्पण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थ या लघु चित्रपट निर्मितीच्या निमित्ताने अशा इच्छुक कलाकारांचे मोफत ऑडिशन घेण्यात येणार आहे. यासाठी हौशी बाल व प्रौढ कलाकारानी शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ब्रम्हांड हॉल, अन्नपूर्णा मेस जवळ, नेसरी रोड कोवाड येथे उपस्थित रहावे. असे आवाहन कृष्णा बामणे, यश जाधव, अथर्व पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment