कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
निट्टूर (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायत व गावातील विविध क्षेत्रातील निवृत्त झालेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत स्थापन करण्यात आलेल्या आधार बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समाज प्रबोधन व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांचे 'न समजलेले आईबाप' हे शुक्रवारी दि. २६ रोजी व्याख्यान आयोजित केले आहे. याबाबतची माहिती आधार या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जी. आर. पाटील व सरपंच गुलाब पाटील यांनी दिली.
हा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता ग्रामपंचायत जवळ असलेल्या भैरवनाथ व राम लक्ष्मी मंदिर आवारात होणार आहे. याबाबत आधार या संस्थेचे अध्यक्ष जी. आर. पाटील म्हणाले, आधार संस्थेच्या माध्यमातून गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. मागील वर्षी आदर्श सरपंच पेरे पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यंदा समाज प्रबोधन असे प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच परिसरातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment