किटवाड येथील शिक्षक पुंडलिक जाधव यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2025

किटवाड येथील शिक्षक पुंडलिक जाधव यांना पितृशोक

तुकाराम लक्ष्मण जाधव
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

        किटवाड (ता. चंदगड) येथील ब्रह्मलिंग सहकारी दूध संस्थेचे माजी संचालक तुकाराम लक्ष्मण जाधव (वय ७४) यांचे मंगळवारी दि. १६ वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे मुलगी भाऊ-बहीण सुना जावई नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी दि. १८ रक्षाविसर्जन होणार आहे. हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील बी एम टोणपी प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक पुंडलिक जाधव व ब्रम्हलिंग दूध संस्थेचे माजी संचालक बाळकृष्णा जाधव यांचे ते वडील होत. तर कार्वे (ता. चंदगड) येथील रहिवासी व निवृत्त मुख्याध्यापक एन. एल. जाधव यांचे ते मोठे बंधू होत. नंदीहळी (ता. बेळगाव) येथील माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका स्नेहल जाधव यांचे ते सासरे व  शिनोळी औद्योगिक क्षेत्रातील नेसरकर इंडस्ट्रीजचे चेअरमन अनंत नेसरकर (ढोलगरवाडी) यांचे ते मेहूणे होत.

No comments:

Post a Comment