चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये मंगळवार दि. २४ जून २०२५ रोजी पुरुष व महिला उमेदवारांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. महाविद्यालयातील डॉ. पी. आर. पाटील सभागृहात सकाळी ८.३० ते १०.३० नावनोंदणी होणार असल्याची माहिती प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी दिली.
या मेळाव्यामध्ये गोवा, कोल्हापूर, पुणे, बेंगलोर, धारवाड, हैदराबाद येथील इंडस्ट्रियल एरिया मध्ये असलेल्या केमिकल, फार्मासिटिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी बीएससी, एमएससी, बीकॉम, बी. ए., डिप्लोमा, बी. ई., आय. टी. आय व बारावी ही शैक्षणिक पात्रता असेल.
परिसरातील सर्व गरजू पात्रता धारक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. आर. एन. साळुंखे (9421103736) व सुदेश पाटील यांच्याशी (7756058242) संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment