चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
मौजे शिरगाव (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य संघटक ईश्वर महादेव पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक शनिवार दि. २१ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयात गौरव सोहळ्याचे आयोजित केले आहे.
या कार्यक्रमाला शिक्षक समितीचे राज्य नेते शंकर मनवाडकर अध्यक्षस्थानी असतील. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील व माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते श्री. पाटील व त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात येणार आहे. माजी रोहयो राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील व महाराष्ट्र राज्य काँग्रेस कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन होईल. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुधाकर पाटील व हणमंत पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment