![]() |
डी. एस. पाटील |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
किटवाड (ता. चंदगड) येथील रहिवाशी, गावचे माजी सरपंच व नव महाराष्ट्र शिक्षण मंडळ माणगाव संचलित गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील हायस्कूल म्हाळेवाडी चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दुधाप्पा संतू पाटील तथा डी. एस. पाटील वय ७७ यांचे आज गुरुवार दिनांक १९ जून २०२५ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. नव महाराष्ट्र शिक्षण मंडळात शिक्षक म्हणून त्यांनी तालुक्यातील अनेक ठिकाणी एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून सेवा बजावली. तालुक्यातील त्या काळात अति दुर्गम समजल्या जाणाऱ्या किटवाड गावचे सरपंच तसेच गावातील अमर विकास सेवा संस्थेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, उच्चशिक्षित पाच विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दिनांक २३ रोजी सकाळी आहे.
No comments:
Post a Comment