डॉ. आंबेडकर जयंती निमित्त २७ एप्रिल रोजी जेलुगडे येथे भाषण स्पर्धा, प्रवेश विनामूल्य - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2025

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त २७ एप्रिल रोजी जेलुगडे येथे भाषण स्पर्धा, प्रवेश विनामूल्य

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त जय भीम कला, क्रिडा व सांस्कृतिक तरुण मंडळ भीमनगर जेलुगडे (ता. चंदगड) यांच्यावतीने यशस्वी विद्यार्थी व विविध क्षेत्रात उज्वल यश प्राप्त केलेल्या जेलुगडे गावच्या सुपुत्र व सुकन्या यांचा सत्कार व गुणगौरव करण्यात येणार आहे. 

       दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क/ मोफत भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी बाबासाहेब आंबेडकर नसते तर?, भारताचे संविधान, नवकोटीची माता रमाई असे तीन विषय असून वेळ ३ मिनिटे राहील. स्पर्धेतील विजेत्यांना पहिले बक्षिस रोख रुपये ३०००/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, दुसरे बक्षिस रु. २५००/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, तिसरे बक्षिस रु. २०००/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, चौथे बक्षिस - रु. १५००/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, पाचवे बक्षिस - १०००/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असून सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.  

    चंदगड तालुक्यातील उत्सुक विद्यार्थ्यांनी दिनांक २२ एप्रिल पर्यंत आपले नाव व भाषणाचा विषय 9403231950, 9765581950, 7666721185 या नंबरला संपर्क करुन आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन जय भीम कला, क्रिडा व सांस्कृतिक तरुण मंडळ भीमनगर जेलुगडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment