घर फोडून दहा तोळे दागिने, रोख रक्कम, शेतीपंप लंपास...! अतिवाड फाटा येथील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

12 April 2025

घर फोडून दहा तोळे दागिने, रोख रक्कम, शेतीपंप लंपास...! अतिवाड फाटा येथील घटना

 

अतिवाड फाटा : बालाजी चिकले यांच्या घरातील चोरट्यानी फोडलेले कपाट.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
    कोवाड - बेळगाव मार्गावरील अतिवाड फाटा (ता. बेळगाव) येथे बुधवारी रात्री घर फोडी झाली. यात चोरट्यांनी दहा तोळे चांदीचे दागिने व रोख रक्कम रु ५ हजार रुपये व  तीस हजार रुपयांचा शेती पंप अशा ऐवज व वस्तूंवर डल्ला मारला. 
   याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई येथे कार्यरत असणारे लावणी सम्राट बालाजी चिकले यांचे अतिवाड फाटा येथे घर आहे. या घराला ते सध्या कुलूप लावून मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्य करतात. ते अधून मधून गावी येत असल्याने  घरी काही रक्कम आणि किमती वस्तूही ठेवल्या होत्या. घराचे दोन दरवाजे तोडून चोट्यानी आत प्रवेश केला. लोखंडी हत्यारांनी सदर दोन्ही दरवाजाचे कुलूप तोडून  कपाटातील पाच हजार रुपयांची रोख रक्कम तसेच दहातोळे चांदीचे दागिने व घराशेजारी असणारा सुमारे ३० हजार रु. किमतीचा शेती पंप चोरून नेला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घरा समोरच रात्री अडीच पर्यंत काही हॉटेल्स सुरू होती. यानंतरच हा प्रकार घडला आहे. अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शुक्रवारी सकाळी काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन याबाबत अधिक माहिती घेऊन तपास सुरू केला आहे. परिसरात सातत्याने चोऱ्या होत असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. हे ठिकाण महाराष्ट्र राज्य हद्दीपासून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर असल्याने चोरटे केव्हाही चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात आपली हात की सफाई दाखवू शकतात.

No comments:

Post a Comment