आष्टा (प्रतिनिधी)
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, आष्टा (जि सांगली ) यांच्या वतीने, IEEE आणि IIC-ADCET यांच्या संयुक्त विद्यमाने "Innovation 2025" या राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश देशभरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, संशोधनाची रुची निर्माण करणे आणि समाजोपयोगी समस्यांवर उपाय शोधण्याची दिशा विद्यार्थ्यांना मिळवून देणे असा आहे. या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाच्या संकल्पनांना चालना मिळावी आणि भविष्यातील स्टार्टअप्सची पायाभरणी व्हावी, अशी अपेक्षा महाविद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमृत नाटेकर (उपजिल्हाधिकारी, महसूल विभाग, सोलापूर जिल्हा), साकेत भूषण (मुख्य विक्री व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सातारा), शुभम प्रदीप महामुनी (मुख्य कार्यकारी अधिकारी, शिवस्वराज्य कन्स्ट्रक्शन, माजी विद्यार्थी - सिव्हिल विभाग, २०१९), आणि नितीन झनवर (व्यवस्थापकीय संचालक, आष्टा लाइनर्स) हे उपस्थित राहणार आहेत.
गौरव अतिथी म्हणून डॉ. अण्णासाहेब डांगे (संस्थापक अध्यक्ष, एसडीएसएस, इस्लामपूर),अॅड. चिमणभाऊ डांगे (सचिव, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था), विश्वनाथ डांगे (सहसचिव), प्रा. रफीक ए. कनाई (कार्यकारी संचालक) आणि महाविद्यालयाचे संचालक डॉ. एल. वाय. वाघमोडे यांची उपस्थिती लाभणार आहे.
या स्पर्धेमध्ये संगणक, माहिती तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स/मशीन लर्निंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, पर्यावरण, यांत्रिकी, एरोनॉटिकल, ऑटोमोबाईल, अन्न प्रक्रिया, रासायनिक, कृषी, पॉलिमर इत्यादी विविध शाखांमधील प्रकल्प सादर होणार आहेत. सामाजिक आणि औद्योगिक समस्यांवर उपाय सुचवणाऱ्या प्रकल्पांना विशेष प्राधान्य दिले जाणार असून विजेत्यांसाठी एकूण ७५,००० रुपयांच्या बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होईल आणि उद्याचे तंत्रज्ञान घडवणाऱ्या युवा मनांना चालना मिळेल, असा विश्वास प्रा. एस. डी. खटावकर(प्रकल्प समन्वयक) आणि विद्यार्थी समन्वयक अभिषेक भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
“नवीन विचारातूनच नवा भारत घडतो. नवकल्पना म्हणजेच प्रगतीचा पाया आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या कल्पकतेला दिशा द्यावी,” असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment