कुदनूर परिसरात वीजेचा लफंडाव. जनता हैराण, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष्य, अधिकाऱ्यांची मनमानी - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2025

कुदनूर परिसरात वीजेचा लफंडाव. जनता हैराण, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष्य, अधिकाऱ्यांची मनमानी

  


कुंदनूर : सी एल वृत्तसेवा 

       चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कुदनूर व परिसरातील गावांतून गेले काही दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. या गावांतून विजेच्या सतत तक्रारी येत आहेत. त्यामुळे येथील जनता त्रासली असून एक दिवस वीज वितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारनार! असल्याचे नागरिक बोलताना दिसत आहेत. भरमसाठ वीज बिले रोख भरून जर रोजच वीज खंडित होत असेल तर आमचे पैसे झाडाला लागलेले आहेत का? असा सवाल करून यावेळी काही अनुचित घटना घडल्यास वीज वितरण कंपनी जबाबदार असेल असे म्हटले आहे. 

    सततच्या खंडित व अनियमीत पुरवठा मुळे घरातील टीवी, कॉम्प्युटर, फ्रिज व इलेक्ट्रिक उपकरणांवर विपरीत परिणाम होत आहे. इलेक्ट्रिक  उपकरणे खराब होत आहेत. याबाबत फोन करून चौकशी केली असता अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देतात. तुमच्या गावातील कर्मचाऱ्यांना फोन करून जाब विचारा असे सांगितले जाते.  स्थानिक लोकप्रतिनिधींचे इकडे लक्ष नाही. एकंदरीत वीज वितरण कंपनीच्या या कारभाराबद्दल सर्व ग्राहकांनी एकत्र येऊन जाब विचारला पाहिजे! अशी भावना निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment