क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल फादर अग्नेल स्कुलचे क्रिडाशिक्षक इम्रान पठाण यांना "क्रीडादूत" सन्मान देवून सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

23 December 2025

क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल फादर अग्नेल स्कुलचे क्रिडाशिक्षक इम्रान पठाण यांना "क्रीडादूत" सन्मान देवून सत्कार

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हयातील चंदगड तालुक्यात क्रिडा समन्वयक म्हणून काम करत असताना जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल चंदगड फादर अग्नेल इंग्लिश मिडीयम स्कुलचे क्रिडाशिक्षक इम्रान पठाण यांना "क्रीडादूत" सन्मान देवून सन्मानित करण्यात आले. 

        श्री. पठाण हे अनेक वर्षांपासून क्रीडा व शारिरिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी क्रीडा व शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. चंदगड तालुका क्रीडा समन्वयक ३ वर्षे काम केले आहे. त्यांनी केलेली मेहनत आणि उत्तुंग योगदानाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने त्यांना "क्रीडादूत" हा सन्मान प्रदान  करण्यात आला आहे. जिल्हा क्रीडा कोल्हापूर व जिल्हाधिकारी कोल्हापुर यांच्या सहीने त्यांना सन्मानपत्र देण्यात आले आहे. 

       कोल्हापूर येथील महाराष्ट्र हायस्कूल येथे क्रीडा सप्ताह निमित्त माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत, जिल्हा क्रीडाधिकारी विध्या शिरस, चंदगड तालुका क्रीडा अधिकारी सौ. मनिषा पाटील, श्री. जमादार, श्री. पवार यांच्या उपस्थितीत क्रीडा समन्वयक इम्राण पठाण यांचा क्रीडा दुत म्हणून सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर उत्कृष्ट क्रीडा संयोजक म्हणून वसंत मोहणगेकर, पी. वाय. बोकडे, टी. व्ही. खंदाळे, डी. व्ही. पाटील यांचा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment