चंदगड : सी एल वृत्तसेवा
आसगाव माध्यमिक विद्यालय आसगाव (ता. चंदगड) या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र बेंगलोर (ISRO) येथील डॉक्टर यू आर राव सॅटेलाइट सेंटरला भेट दिली.
या भेटीमध्ये अंतराळ संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ ऊमावती यांनी विद्यार्थ्यांना अवकाश याना विषयी अतिशय मार्मिक माहिती सांगून अनेक शंकांचे निरसन केले व अवकाश यान कसे तयार करतात यांची प्रयोगशाळेत जाऊन माहिती दिली. अशा प्रकारची अभ्यास भेट देणारी ही कोल्हापूर जिल्हयातील पहिलीच शाळा आहे.
नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ माणगाव च्या माध्यमिक विद्यालयाने थेट इस्रोला भेट देवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सहल केवळ मौज मजेसाठी नाही तर नवनवीन ज्ञान आत्मसात करण्याचे एक माध्यम असल्याचे सिद्ध केले. या भेटीचा विद्यार्थ्यांना नक्की फायदा होणार आहे. ही अंतराळ संशोधन केंद्राची सहल यशस्वी करण्यासाठी नव महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव माजी आमदार राजेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. नाईक अध्यापक एन. एम. कांबळे, विज्ञान शिक्षक एन. एस. गावडे, लिपीक मोहन आवडन, अंकुश गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तालुक्यातील या विशेष सहलीमुळे पालकांमधून व संस्थेकडून विशेष कौतुक केले जात आहे.



No comments:
Post a Comment