चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
माडवळे (ता. चंदगड) येथील ॲनॉस टॅलेंट या संस्थेतर्फे रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मजरे कारवे येथील महात्मा फुले विद्यालय व गुरुवर्य म. भ. तुपारे ज्युनिअर कॉलेजमध्ये भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा सह अनेक राज्यांतील इयत्ता तिसरी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर असून, www.anostalent.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय १५ हजार, तृतीय १० हजार, तसेच अनुक्रमे ५ हजार, ४ हजार, ३ हजार, २ हजार, १५००, १२०० व १ हजार रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक इयत्तेसाठी ३ हजार रुपयांचे विशेष बक्षीस देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामान्यज्ञान वाढवणे व स्पर्धात्मक वृत्तीला चालना देणे हा या स्पर्धेचा उद्देश असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८१४९९८६८७२ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा स्पर्धा होणाऱ्या शाळांमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment