गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 17 फेब्रुवारीला अनोख्या भाषण स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2019

गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 17 फेब्रुवारीला अनोख्या भाषण स्पर्धा

ॲड. रवि रेडेकर
चंदगड / प्रतिनिधी 
चंदगड येथील गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने चंदगड तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सन्माननीय व्यक्तीसाठी 17 फेब्रुवारी 2019 रोजी चंदगड पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी दहा वाजता भाषण स्पर्धा आयोजित केल्याची माहीती गुरुकुल चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रवि रेडेकर यांनी दिली. 
स्पर्धेचे उद्घाटन आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते होईल. माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील अध्यक्षस्थानी असतील. तहसिलदार शिवाजी शिंदे, पोलिस निरिक्षक एस. एम. यादव, सभापती बबनराव देसाई, गटविकास अधिकारी आर. बी. जोशी व गटशिक्षण अधिकारी सुमन सुभेदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहातील. जि. प. सदस्या विद्या पाटील, उपसभापती विठोबाई मुरकुटे, पं. स. सदस्या रुपा खांडेकर, मनिषा शिवनगेकर, नंदिनी पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन होईल. सुनिल कोंडुसकर (दै. सकाळ), संपत पाटील (दै. महाराष्ट्र टाईम्स्) नारायण गडकरी (दै. पुढारी), नंदकुमार ढेरे (दै. लोकमत), निवृत्ती हारकारे (दै. तरुण भारत), विलास कागणकर (दै. पुण्यनगरी), संतोष सावंत-भोसले (दै. सह्याद्री दर्पण), राहुल पाटील (साप्ताहिक सत्यघटना), अनिल धुपदाळे (दै. महासत्ता) हे पत्रकार व वकील बार असोसिएशन व गुरुकुल ट्रस्ट मेंबर विशेष उपस्थित रहाणार आहेत. या अनोख्या स्पर्धेच्या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन गुरुकुल चॅरीटेबल स्ट्रस्टच्या वतीने केले आहे. 


No comments:

Post a Comment