सुनिता रेडेकर यांच्या स्वनिधीतून पेव्हिंग क्लॉक बसवण्यासाठी २ लाखांचा निधी - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2019

सुनिता रेडेकर यांच्या स्वनिधीतून पेव्हिंग क्लॉक बसवण्यासाठी २ लाखांचा निधी


चंदगड / प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील मौजे खानापूर पैकी कासारशेत येथे जि. प. सदस्या सुनिता रमेशराव रेडेकर यांनी आपल्या स्वनिधीतून पेव्हिंग ब्लाॅक बसवण्यासाठी २ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला. या कामाचे उद्घाटन सुनिता रमेशराव रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजुकाका रेडेकर, माजी सभापती अनिता नाईक, सरपंच पुनम गुरव, उपसरपंच युवराज जाधव, सदस्य  ज्ञानदेव जाधव, प्रभावती गुरव, कल्पना डोंगरे,  ग्रामसेवक विशाल दुंडगेकर, धनाजी जाधव,  शिवाजी जाधव, विलास गुरव, अशोक जाधव, प्रकाश दोरुगडे, रमेश पाटील, नेताजी नाईक, महेंद्र जाधव, नागोजी जाधव, कंत्राटदार अरुण केसरकर उपस्थित होते. कार्यक्रमाला खानापूर, रायवाडा, नाईक वस्ती, मोळा वस्ती येथील नागरीक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. जी. गुरवर यांनी केले तर आभार उपसरपंच युवराज जाधव यांनी मानले.


No comments:

Post a Comment