चंदगड / प्रतिनिधी
निटटूर (ता. चंदगड) येथे शिवसेना शाखा व ग्रामपंचायत निटटूर यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदागोंदी कारभाराच्या विरोधात व रस्त्याच्या कामात चाललेला हलगर्जीपणा याला कंटाळून भर उन्हात सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्यांसबंधीत आमच्या मागण्या दोन दिवसात मान्य झाल्या नाहीत तर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेनचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख अशोक पाटील, सरपंच अमोल सुतार, उपसरपंच सचिन पाटील, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष पिणु पाटील यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी रस्त्यावर दुतर्फा गाड्यांची रांग लागली होती.
No comments:
Post a Comment