निट्टूर येथील अनुजा लोहार हिचे वक्तृत्व, गायन, काव्य स्पर्धेत यश - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2026

निट्टूर येथील अनुजा लोहार हिचे वक्तृत्व, गायन, काव्य स्पर्धेत यश

  

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे पार पडलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना अनुजा लोहार 

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

     निट्टूर (ता. चंदगड) येथील कु. अनुजा दत्तात्रय लोहार हिने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथील सांस्कृतिक विभागाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयीन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड येथे ती बीएससी (CS II)  ची विद्यार्थिनी आहे‌. या वक्तृत्व स्पर्धेत 'एआय चा मानवी जीवनातील हस्तक्षेप विधायक की विघातक'? या विषयावर भाषण केले होते. 

   या स्पर्धेबरोबरच तिने दि सह्याद्री मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी बेळगाव यांच्या वतीने आयोजित गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. तर कडोली ता. जि. बेळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या ४१ व्या कडोली मराठी साहित्य संमेलनात घेण्यात आलेल्या 'काव्य तरंग' कवी संमेलनात भाग घेऊन सादर केलेल्या कवितांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली होती. अनुजा हिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment