जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार -
![]() |
| राजश्री गावडे मानसी भोगण विद्या पाटील रचना गावडे |
पंचायत समितीचे विजयी उमेदवार -
![]() |
| मनस्विनी कांबळे रविंद्र बांदिवडेकर विलास पाटील सुवर्णा कुंभार |
![]() |
| मधुकर आंबेवाडकर पांडुरंग बेनके प्रेमा हुलजी संज्योती मळवीकर |
संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा दि. ९-२-२०२६
चंदगड तालुक्यातील अडकूर, माणगाव, कुदनूर व तुडये या ४ जिल्हा परिषदांचा व अडकूर, गवसे, माणगाव, कोवाड, कुदनुर, तुर्केवाडी, तुडये व हेरे या ८ पंचायत समितींचा निकाल सोमवार (ता. ९) जाहीर झाला. जिल्हा परिषद माणगाव गटामध्ये मानसी कल्लाप्पा भोगण, कुदनूर गटामध्ये विद्या विलास पाटील व तुडये गटामध्ये रचना राहुल गावडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या तर अडकूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या राजश्री लक्ष्मण गावडे या उमेदवार विजयी झाल्या.
पंचायत समिती ८ गणामध्ये भाजपचे अडकूर गणामध्ये रविंद्र बांदिवडेकर, गवसे गणामध्ये मनस्विनी कांबळे व कोवाड गणामध्ये सुवर्णा कुंभार हे ३ उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे माणगाव गणामध्ये विलास नाईक, कुदनुर गणामध्ये मधुकर आंबेवाडकर, तुर्केवाडी गणामध्ये पांडुरंग बेनके, तुडये गणामध्ये प्रेमा हुलजी व हेरे गणामध्ये संज्योती मळवीकर हे उमेदवार विजयी झाले.
सोमवारी सकाळी १० वाजता १६ टेबलवर मतमोजणीला सुरवात झाली. प्रारंभी पोस्टल मतदान मतमोजणीसाठी घेण्यात आले. ४ जिल्हा परिषद व ८ पंचायत समितीसाठी १६ टेबलवर एकाच वेळी केंद्रनिहाय मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासून अडकूर गट, अडकूर गण व गवसे गणाचे भाजपचे उमेदवार आघाडीवर होते, ते शेवटी विजयापर्यंत आघाडीवरच राहिल्याने त्यांचा विजय झाला. तर माणगाव, कुदनुर व तुडये गट व गणामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुरवातीपासून आघाडीवर होते. शेवटच्या ४ फेऱ्यामध्ये कोवाड गणामध्ये भाजपच्या उमेदवार सुवर्णा कुंभार यांनी आघाडीत घेत विजय मिळवला. हि आघाडी सोडता अन्य ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरुवातीपासून आघाडीवर राहिल्याने त्यांना विजय मिळाला.
जसजसा एकेका केंद्राचा निकाल ध्वनीक्षेपकावरुन पुकारला जात होता. तसतसे कार्यकर्ते घोषणा देत, गुलाल उधळत पक्षाचे झेंडे दाखवून जल्लोष करत होते. तहसिल कार्यालयापासून काही अंतरावर बॅरीकेट लावून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सर्व ४ गट व ८ गणाची मतमोजणी एकाच वेळी केली जात होती. त्यामुळे शेवटचा निकाल सायंकाळी ५ वाजता हाती आला. तत्पुर्वी साडेतीन वाजता निकालाचा कल समजल्यानंतर उमेदवारांसह माजी आमदार राजेश पाटील हे निकालाच्या ठिकाणी उपस्थित झाले. निकालानंतर निवडणुक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे व सहा. निवडणुक निर्णय अधिकारी राजेश चव्हाण यांनी विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र दिले.
निकालानंतर मात्र कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजेश पाटील, कल्लाप्पा भोगण, विलास पाटील, संतोष मळविकर, पांडुरंग बेनके यांना खांद्यावर उचलून घेवून आनंदोत्सव साजरा केला. रनरणत्या उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी नव्हता. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कार्यकर्ते दिवसभर उन्हात निकालाच्या प्रतिक्षेत थांबून होते.
हाती आलेल्या निकालानुसार विजयी उमेदवार खालीलप्रमाणे..................
जिल्हा परिषद विजयी उमेदवार (कंसात गट व पक्ष)
१. राजश्री लक्ष्मण गावडे (अडकूर - भाजप)
२. मानसी कल्लाप्पा भोगण (माणगाव - राष्ट्रवादी)
३. विद्या विलास पाटील (कुदनुर - राष्ट्रवादी)
४. रचना राहुल गावडे (तुडये - राष्ट्रवादी)
पंचायत समिती विजयी उमेदवार (कंसात गण व पक्ष)
१. मनस्विनी महादेव कांबळे (गवसे, भाजप)
२. रविंद्र नामदेव बांदिवडेकर (अडकूर, भाजप)
३. विलास दत्तात्रय नाईक (माणगाव, राष्ट्रवादी)
४. सुवर्णा चंद्रकांत कुंभार (कोवाड, भाजप)
५. मधुकर हणमंत आंबेवाडकर (कुदनुर, राष्ट्रवादी)
६. पांडुरंग कृष्णा बेनके (तुर्केवाडी, राष्ट्रवादी)
७. प्रेमा जगन्नाथ हुलजी (तुडये, राष्ट्रवादी)
८. संज्योती संतोष मळवीकर (हेरे, राष्ट्रवादी)



No comments:
Post a Comment