जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल - जनतेचा कौल मान्य...! - आमदार शिवाजीराव पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

09 February 2026

जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल - जनतेचा कौल मान्य...! - आमदार शिवाजीराव पाटील

आमदार शिवाजीराव पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    भाजपा हा लढणारा विचार आहे, सत्तेतील अनेक मंत्री व अनेक सहकारी विरोधात असताना देखील पक्ष हितासाठी व माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी भाजपाचा कार्यकर्ता एकहाती व निखराने लढत होता. म्हणून माझ्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या विचारासाठी लढणाऱ्या माझ्या प्रत्येक बंधुतुल्य कार्यकर्त्याचा व लाडक्या बहिणींचा मला सार्थ अभिमान आहे. जवळपास सर्वच ठिकाणी भाजपा पक्षाने २ नंबरची मतं घेतली आहेत. काही ठिकाणी भाजपा उमेदवारांचा निसटता पराभव झाला. भाजपा पक्ष व देवाभाऊंच्या विचारांवर लढणाऱ्या उमेदवारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेल्या सर्व मतदारांचे मनस्वी आभार व निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन व पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा !!

    बंधू-भगिनीनो खचून जाऊ नका, आपण आत्मचिंतन करून पुन्हा नव्याने सुरुवात करूया, नव्या विकास पर्वासाठी, नव्या जिद्दीने पुन्हा मैदानात उतरण्यासाठी नव्या उमेदीने चालत रहा असे आवाहन आमदार श्री. पाटील यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment