राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मुंबई येथे मेळाव्याचे नियोजन - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2019

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मुंबई येथे मेळाव्याचे नियोजन


चंदगड / प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मुंबई येथील शिवाजी पार्क येथे महामेळावा आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते ना. महादेव जाणकर, आ.राहचल कुल, परिवहन मंत्री दिवाकर रावते मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याच्या तयारीसाठी आजरा, चंदगड, तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक राज्य सरचिटणीस आण्णासाहेब रुपणावर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. जिल्हाअध्यक्ष डॉ. संदेश कचरे, जिल्हा संपर्क प्रमुख जयशिंग सुतार, सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत खोद्रे, तालुकाघ्यक्ष उत्तम पाटील, सरचिटणीस विजय कांबळे, वि.सभा,संपर्क प्रमुख प्रदिप गुरव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment